top of page

व्यावसायिक ऑनलाइन भाषांतर सेवा

Marathi

TranslationServices.com कोणत्याही भाषेमध्ये, कोणत्याही विषयासाठी व्यावसायिक भाषांतर पुरवते. मुंबई, पुणे, नागपूर, आणि जगभरातील समाधानी ग्राहकांसाठी आमच्या कुशल टीमने हजारो कागदपत्रांचे भाषांतर केले आहे. जर आपणास मराठी, इंग्रजी, हिंदी, स्पॅनिश, किंवा चीनी भाषेत अथवा भाषेतून अनुवाद आवश्यक असल्यास, आम्ही आपल्या प्रकल्पाचे सर्वोच्च गुणवत्तेत भाषांतर करण्याची ग्वाही देतो.


निवेदित दरांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

 

आम्ही कोणत्या सेवा पुरवतो?

 

TranslationServices.com व्यवसायापासून, ते लेखक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रकारच्या पार्श्वभूमीच्या ग्राहकांसाठी उच्च-गुणवत्तेचे भाषांतर प्रदान करते. मराठी भाषेसाठी अनुवाद सेवा प्रदान करण्याव्यतिरिक्त, आमचा निपुण अनुवाद कार्यसंघ नियमितपणे 100 हून अधिक भाषांमध्ये भाषांतर करतो.
आम्ही पुढील सेवा पुरवितो:

 

 • शैक्षणिक अनुवाद. आम्ही कोणत्याही विषयाचे मराठी ते इंग्रजी, मराठी ते जर्मन, मराठी ते जपानी आणि इतर अनेक भाषिक जोड्यांमध्ये परवडणारे भाषांतर करू शकतो.

 

 • व्यवसायिक अनुवाद. आपणांस एखादी यादी मराठीमधून इंग्रजीमध्ये किंवा अन्य भाषेत अनुवादित करायची आहे का? आम्ही मानवी संसाधनविषयक माहितीपुस्तिका, उत्पादन वर्णन, तसेच अन्य व्यवसाय आणि विपणन सामग्रीसाठी व्यवसायिक अनुवाद सेवा प्रदान करतो.

 

 • साहित्यिक अनुवाद. आपली आंतरराष्ट्रीय वाचकसंख्या वाढवण्यास तयार आहात? प्रणय कादंबर्‍या पासून, ते वैज्ञानिक कल्पित हस्तलिखिते आणि जीवनचरित्रे, आम्ही जवळपास प्रत्येक शैलीतील पुस्तके भाषांतरित केली आहेत. आपला आवाज आणि शैली जपण्यासाठी आमचे साहित्यविषयक अनुवादक अक्षरशः शब्दामागे शब्द भाषांतरित करण्यापलीकडे जातात.

 

 • वैद्यकीय अनुवाद. आम्ही स्वत: वैद्यकीय अनुवाद पुरवत नाही, परंतु आम्ही एका वैद्यकीय भाषांतर संस्थेशी भागीदारी केली आहे जी त्वरित आणि अचूकरित्या नोट्स, वैद्यकीय अहवाल, रुग्णांच्या मुलाखती, आणि इतर वैद्यकीय दस्तऐवजांचे मराठीत किंवा मराठीतून भाषांतर करु शकते.

 

 • कायदेविषयक अनुवाद. आम्ही कायदेशीर भाषांतर संस्थेशी भागीदारी केली आहे ज्यांना आपल्या हेतूची पत्रे, प्रतिज्ञापत्रे, कृत्ये, गोपनीयता धोरणे, आणि इतर कायदेशीर दस्तऐवजांचे भाषांतर करण्यात अनुभव आणि नैपुण्य आहे. आमचा कायदेशीर अनुवादक भागीदार हा नेहमीच व्यावसायिक आणि गोपनीय असतो.

 

 • प्रमाणित अनुवाद. जर आपणास स्थलांतर करण्यासाठी किंवा तत्सम हेतूंसाठी एखादा शैक्षणिक प्रतिलेख, विवाह अथवा घटस्फोट प्रमाणपत्र, किंवा इतर कागदपत्र मराठीतून अनुवादित करायचे असल्यास ही सेवा निवडा.

 

 • स्थानिकीकरण. आपला व्यवसाय परदेशी बाजारात विस्तारित करण्याचा विचार करत आहात? आम्ही आपली सामग्री विशिष्ट देश आणि प्रदेशांसाठी अनुकूल बनवू शकतो.

 

 • उपशीर्षक. आम्ही आपल्या व्हिडिओंमधील मराठी संवाद भाषांतरित करू शकतो आणि दुसऱ्या भाषेत उपशीर्षके तयार करू शकतो जसे कि इटालियन, पोर्तुगीज किंवा व्हिएतनामी.

 

 • सामान्य अनुवाद. काय आपणांस केवळ मराठी भाषेतील एखादा दस्तऐवज लवकरात लवकर भाषांतरित करून हवा आहे? आम्ही प्रत्येक गोष्टीचे अगदी स्वस्त आणि अचूकरित्या भाषांतर करतो, तर मग आपल्या मराठी भाषांतर गरजांविषयी चर्चा करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.

 

आम्ही कोण आहोत?


TranslationServices.com मधील अनुवादक हे अत्यंत पात्र असे व्यावसायिक आहेत, यासोबतच खात्रीशीर अनुभव असणारे आणि तपशीलाकडे अभूतपूर्व लक्ष देणारे आहेत. आमचे मराठी अनुवादक अनेक विषयांमध्ये तज्ज्ञ आहेत, याचा अर्थ असा की आम्ही प्रत्येक प्रकल्प हा कार्यसंघाच्या योग्य सदस्यास देतो. अगदी सोप्या शब्दांत मांडायचे तर, आम्ही मुंबई, पुणे, नागपूर, व इतर ठिकाणच्या लोकांना उत्कृष्ट भाषांतर सेवा पुरवतो.TranslationServices.com सोबत काम का करावे?
 
 • कोणत्याही विषयाकरिता किंवा शैलीसाठी आम्ही परवडणारा तसेच अचूक व्यवसायिक, शैक्षणिक, आणि साहित्यिक अनुवाद प्रदान करतो.

 • आम्ही कोणत्याही भाषेमध्ये, कोणत्याही विषयासाठी व्यावसायिक मानवी अनुवाद प्रदान करतो.

 • इतर भाषांतर सेवांसारखे, आम्ही मशीन अनुवादावर अवलंबून राहत नाही; त्याऐवजी आम्ही प्रत्येक भाषांतर प्रकल्प हा आमच्या व्यावसायिक कार्यसंघाच्या सदस्यांकडे सोपवितो.


आमचे व्यावसायिक अनुवादक साध्य करीत असलेल्या उच्च दर्जाच्या गुणवत्तेचा आम्हाला अभिमान आहे, आणि आम्ही आमच्या कामासंबंधीच्या आपल्या समाधानाची हमी देतो.

 

निवेदित दरांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

bottom of page